दोन गटात हाणामारी; आठ जणांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: September 17, 2014 02:34 IST2014-09-17T02:34:58+5:302014-09-17T02:34:58+5:30

फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

Two group clashes; Crime against eight people | दोन गटात हाणामारी; आठ जणांविरुद्ध गुन्हा

दोन गटात हाणामारी; आठ जणांविरुद्ध गुन्हा

अकोला: फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी उशिरा रात्री घडली. हाणामारीत दोघे जखमी झाले असून, डाबकी रोड पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चार जणांना पोलिसांनी अटक केली.
खैर मोहम्मद प्लॉटमधील मोहम्मद सलीम शेख सफदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शरीफ नगर परिसरात फटाके फोडण्याच्या वादातून शेख अन्सार शेख जब्बार, शेख जब्बार, शेख मुजम्मिल आणि शेख सादिक शेख मन्नू यांनी त्यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना पाईपने मारहाण करून जखमी केले. त्यांच्या तक्रारीनुसार डाबकी रोड पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२४(३४) नुसार गुन्हा दाखल केला. दुसर्‍या गटातील शेख सादिक शेख मन्नू याने दिलेल्या तक्रारीमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून शेख सलीम शेख सफदर याच्यासह शेख कादिर शेख सफदर, शेख वाजिद शेख रशीद, अहमद राजा अहमद दाऊद यांनी मारहा केल्याचे म्हटले. पोलिसांनी चारही आरो पींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दुपारी न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली.

Web Title: Two group clashes; Crime against eight people