व-हाडात दोन शेतकरी आत्महत्या

By Admin | Updated: November 11, 2015 01:07 IST2015-11-10T20:27:19+5:302015-11-11T01:07:29+5:30

अकोला व वाशिम जिल्ह्यात दोन कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या केली.

Two farmers suicides in Vaada | व-हाडात दोन शेतकरी आत्महत्या

व-हाडात दोन शेतकरी आत्महत्या

अकोला :ऐन दिवाळीच्या तोंडावर अकोला व वाशिम जिल्ह्यात दोन कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.यामध्ये एका वृद्ध शेतकरी महिलेचा समावेश आहे. तेल्हारा येथील गंगुबाई प्रल्हाद वायकर या महिला शेतकर्‍याकडे दोन एकर शेती होती. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यावर्षीची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून गंगुबाईने कोठा रस्त्यावरील खाडे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यासंदर्भात कैलास प्रल्हाद वायकर यांनी तेल्हारा पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत. गंगुबाई वायकर यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली व आप्त परिवार आहे. आत्महत्येची दुसरी घटना वाशिम जिल्ह्यात घडली. मोहरी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद नामदेव गायकवाड (६0 वर्ष) यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे ५ एकर कोरडवाहू शेती होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३७ हजार ५00 रुपयाचे कर्ज होते. कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढावा या विवंचनेतूनच त्यांनी मृत्युस कवटाकळले.

Web Title: Two farmers suicides in Vaada