खांदला येथे वीज पडून दोन शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 16:52 IST2020-10-11T16:52:23+5:302020-10-11T16:52:40+5:30
lightning strike, farmers injured शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले.

खांदला येथे वीज पडून दोन शेतकरी जखमी
मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम खांदला येथील दोन शेतकरी ११ आक्टोबर रोजी दुपारी शेतात गेलेले दोन शेतकरी वीज पडून भाजल्याने जखमी झाले.
खांदला येथील विजय दशरथ पिंपळे (४७) व सुनील आधार मोहिते (२५) हे दोघे शेतातील सोयाबीन पीक कापणीला आले का याची पहाणी करण्यासाठी शेतात गेले होते. तालुक्यात पावसाने अचानक वीजेच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली दरम्यान शेतात पहाणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना तातडीने अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
सतत एक तास आलेल्या पावसाने शेकडो हेक्टररील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या तालुक्यात सोयाबीन कापणीची लगबग सुरू आहे. अनेक हेक्टर वरील सोयाबीन कापून शेतात पडून आहे. वेचणीला आलेला कापूस ओला झाला आहे याच बरोबर उभे असलेल्या सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे