शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अकोला जिल्ह्यात दिवसभरात दोघांचा मृत्यू, ४३ पॉझिटिव्ह, १८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 7:07 PM

Akola News आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २९३ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २९३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४०, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये तीन अशा एकूण ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३८८  वर गेली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे   २६३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये  न्यू खेतान नगर येथील चार,  आदर्श कॉलनी व कीर्ती नगर येथील  प्रत्येकी तीन, मलकापूर व  मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, गीता भवन, व्ही एच बी कॉलनी गोरक्षण रोड, महसूल कॉलनी,  राम नगर, सत्यदेव नगर, मूर्तिजापूर, नांदखेड ता. अकोट, पंचशील नगर, गोडबोले प्लॉट, किनखेड पूर्णा ता. अकोट, धामना ता. अकोट, गोरक्षण रोड, शंकर नगर, जवाहर नगर, रामदास पोलीस क्वॉर्टर, लहान उमरी, वाशिम बायपास, सातव चौक, बळवंत कॉलनी,  जीएमसी हॉस्टेल, तेल्हारा, जीएमसी, कौलखेड, जिल्हा परिषद कॉलनी खडकी, अकोट व बाळापूर  येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

पारस व किनखेड येथील रुग्णांचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील ६६ वर्षीय पुरुषाचा रविवारी मुत्यू झाला. त्यांना २० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.  अकोट तालुक्यातील किनखेड ( पूर्णा)  येथील ६३ वर्षीय महिलेचा मुत्यू झाला. त्यांना २७ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड चाचण्यांमध्ये तीन पॉझिटिव्हरविवारी झालेल्या एकूण १०० रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत  २५१२८   चाचण्यांमध्ये १७७१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

१८ जणांना डिस्चार्जरविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून एक, अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनिक येथून दोन, हॉटेल रिजेंसी येथून एक, तर  हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६२८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण  ९३८८  जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८४६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६२८  अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला