दोन दिवसांत ३६ बसेस १९ हजार किमी धावल्या; हाती पडले केवळ ५ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:44+5:302021-04-14T04:16:44+5:30

--बॉक्स-- दोन दिवसांत नऊ लाखांचा तोटा अकोला आगाराला एका दिवसाला सात लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न होत होते. दोन दिवसांत ...

In two days, 36 buses ran 19,000 km; Only 5 lakhs fell into the hands! | दोन दिवसांत ३६ बसेस १९ हजार किमी धावल्या; हाती पडले केवळ ५ लाख!

दोन दिवसांत ३६ बसेस १९ हजार किमी धावल्या; हाती पडले केवळ ५ लाख!

--बॉक्स--

दोन दिवसांत नऊ लाखांचा तोटा

अकोला आगाराला एका दिवसाला सात लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न होत होते. दोन दिवसांत फेऱ्या घटल्याने एका दिवसाचे उत्पन्न अडीच लाखांवर आले आहे.

वीक एण्ड लॉकडाऊनमुळे शनिवारी केवळ ९.५ हजार किमी अंतर बस धावली. प्रवासी नसल्याने अनेक एसटी बसेस रद्द करण्यात आल्या. केवळ १७-१८ बसेस एका दिवसाला धावल्या.

दोन दिवसांमध्ये एसटी महामंडळाला नऊ लाखांचा तोटा झाला. तर दोन दिवसांत केवळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असले तरी लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.

--बॉक्स--

कार्यालयीन कर्मचारीही कमी

शनिवारी, रविवारी वीक एण्ड असल्याने बहुतांश कार्यालयीन कर्मचारी सुटीवर होते. तर जेवढे शेड्यूल होता तेवढे कर्मचारी कामावर होते. वाहनचालक व वाहक यांची ड्युटी लावण्यात आली होती. प्रवासी संख्यापाहून बसेस सोडण्यात येत असल्याने चालक व वाहकांला सुटी नव्हती.

--बॉक्स--

१८ दोन दिवसांत धावलेल्या बसेस

५ लाख रुपये मिळाले दोन दिवसांत

९ लाख झाला तोटा दोन दिवसांत

Web Title: In two days, 36 buses ran 19,000 km; Only 5 lakhs fell into the hands!