खरडून गेलेल्या जमिनीपोटी दोन कोटींची मदत प्राप्त
By Admin | Updated: April 2, 2015 02:02 IST2015-04-02T02:02:24+5:302015-04-02T02:02:24+5:30
अकोला जिल्ह्यातील २७७0 शेतक-यांना मिळणार लाभ.

खरडून गेलेल्या जमिनीपोटी दोन कोटींची मदत प्राप्त
अकोला : गेल्या जून ते सप्टेंबर २0१३ या कालावधीत अतवृष्टीमुळे जिल्ह्यात खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईपोटी १ कोटी ९९ लाख ४६ हजारांचा मदत निधी शासनामार्फत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. प्राप्त झालेल्या मदतीचा जिल्ह्यातील २ हजार ७७0 शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. जून ते सप्टेंबर २0१३ या कालावधीत झालेल्या अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शेतजमीन खरडून गेली होती. यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये ९९४ हेक्टर १९ आर क्षेत्राच्या नुकसानभरपाईपोटी २ हजार ७७0 शेतकर्यांना मदतीसाठी शासनामार्फत १ कोटी ९९ लाख ४६ हजार रुपयांचा मदत निधी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. प्राप्त झालेला मदत निधी महसूल विभागामार्फत संबंधित अतवृष्टिग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तालुकास्तरावर वितरित करण्यात येणार आहे.