दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST2021-05-25T04:21:28+5:302021-05-25T04:21:28+5:30

अकोला : जिल्हांतर्गत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे ...

Two criminal gangs banished for two years! | दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी हद्दपार!

दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी हद्दपार!

अकोला : जिल्हांतर्गत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सोमवारी दिले. या हद्दपार करण्यात आलेल्या टोळ्यांमध्ये पाच आरोपींचा समावेश आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीने गुन्हेगारी करणारे गुन्हेगार रिजवान खान उर्फ लालाखान रियाजखान (१९), शुभम शंकर मार्गे (२५) (दोन्ही रा. आरपीटीएस रोड, अकोला), शेख मेहबूब शेख ईलियास (२६, रा. भगतवाडी) यांच्यासह डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार शेखर ओमप्रकाश शर्मा (३३) आणि मुकेश ओमप्रकाश शर्मा (३२, रा. डाबकी रोड) यांच्यावरील गुन्ह्यांची मालिका पाहता, त्यांच्याविरुद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार, जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी सोमवारी दोन्ही गुन्हेगारी टोळीतील पाचही आरोपींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करुन त्यांच्यावर हद्दपारीची प्रक्रिया पोलीस विभागातर्फे करण्यात येत असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Two criminal gangs banished for two years!