अकोल्यातील दोन क्रिकेटपटूंची आयपीएलमध्ये निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:19 IST2018-12-19T15:18:48+5:302018-12-19T15:19:25+5:30
अकोला : विदर्भ क्रिकेट संघटना आणि अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची आयपीएल २0१९ क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. खऱ्या ...

अकोल्यातील दोन क्रिकेटपटूंची आयपीएलमध्ये निवड!
अकोला: विदर्भ क्रिकेट संघटना आणि अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची आयपीएल २0१९ क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. खऱ्या अर्थाने अकोल्यातील क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी प्राप्त झाली आहे. भारतीय युवा संघाकडून इंग्लंड, मलेशिया दौरा केलेला अष्टपैलू खेळाडू दर्शन नळकांडे याला ३0 लाख रुपयांची बोली लावून किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघात स्थान दिले आहे, अशी माहिती अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार व विदर्भ क्रिकेट संघटनेचे संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.
दर्शन नळकांडे व अथर्व तायडे यांनी अकोला क्रिकेट क्लब ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मजल मारली आहे. दर्शन नळकांडे याने यापूर्वी विदर्भाच्या १४, १६ व १९ वर्षाआतील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १४ व १६ वर्षाखालील विदर्भ संघाचा कर्णधार म्हणून त्याने प्रतिनिधित्व केले. तसेच १९ वर्षाआतील विदर्भ संघात तो होता. इंग्लंड दौºयासाठी भारतीय युवा संघातसुद्धा त्याची निवड झाली होती. मलेशियामध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेत भारतीय युवा संघामध्ये त्याची वर्णी लागली होती. सध्या २३ वर्षाआतील विदर्भ संघाकडून तो रणजी ट्रॉफी खेळत आहे. त्याचा अष्टपैलू खेळ पाहता, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने त्याला ३0 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात स्थान दिले आहेत. त्यामुळे दर्शन हा भारतीय युवा संघ व आयपीएल खेळणारा अकोल्यातील पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. लवकरच दर्शन अकोलेकरांना या क्रिकेट संघात खेळताना दिसेल. यासोबतच अकोला क्रिकेट क्लबचा दुसरा खेळाडू अथर्व तायडे याची आयपीएलसाठी निवड झाली आहे. अथर्व तायडे यानेसुद्धा १४, १६, १९ आणि २३ वर्षाआतील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात विदर्भ संघाने १९ वर्षाआतील स्पर्धेचे विजेतेपदसुद्धा पटकावले. अथर्वने इराणी ट्रॉफीतसुद्धा खेळाचे प्रदर्शन केले. सध्या तो रणजी स्पर्धेत खेळत आहे. याशिवाय अथर्वने १९ वर्षाआतील भारतीय संघामध्ये श्रीलंका दौºयासाठी त्याची निवड झाली होती. इमरजिंग भारतीय संघाचेसुद्धा त्याने प्रतिनिधित्व केले आहे. या दोन्ही खेळाडूंची निवड झाल्यामुळे अकोलेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. (प्रतिनिधी)
क्रिकेटपटूंवर यांनी केला कौतुकाचा वर्षाव
दर्शन नळकांडे व अथर्व तायडे यांची आयपीएलमध्ये निवड झाल्याने अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नरेंद्र पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, दिलीप खत्री, सदस्य अॅड. मुन्ना खान, गोपाळ भिरड, शरद अग्रवाल, विवेक बिजवे, जावेद अली, परिमल कांबळे, देवकुमार मुधोळकर, सुमित डोंगरे, पवन हलवने, अमित माणिकराव, शारिक खान, रवी ठाकूर यांनी कौतुक केले.