राकाँला हवेत दोन मतदारसंघ

By Admin | Updated: September 8, 2014 00:12 IST2014-09-08T00:12:14+5:302014-09-08T00:12:14+5:30

आघाडीच्या चर्चेवर अकोला जिल्ह्यातील राकाँचे भवितव्य ठरणार.

Two constituencies in the block | राकाँला हवेत दोन मतदारसंघ

राकाँला हवेत दोन मतदारसंघ

अकोला : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबतची अंतिम चर्चा येत्या बुधवारी दिल्लीत होणार असून या वाटाघाटीतच अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे. आघाडीबाबत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात दोन मतदारसंघावर दावा करणार्‍या राष्ट्रवादीकडील एकमेव मतदारसंघ काँग्रेसने मागितला असून त्याबदल्यात दर्यापूर मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याबाबत चर्चा सुरू आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने तर स्वतंत्र प्रचार सभांचा नारळ फोडून यात भरच घातली आहे. असे असले तरी आघाडी होईलच, असे अनेक पदाधिकार्‍यांना वाटते. आघाडी झाली तर अकोला जिल्हय़ातील दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावेत, यासाठीचे सादरीकरण पक्षाच्यावतीने राकाँच्या पक्षश्रेष्ठीकडे करण्यात आले आहे. यामध्ये मूर्तिजापूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आम्ही सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मांडली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही याच मतदारसंघावर दावा केला आहे. ग तवेळच्या पराभवाचे दाखल देत हा मतदारसंघ काँग्रेसला देऊन त्याबदल्यात दर्यापूर हा शेजारचाच राखीव मतदारसंघ देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणताही निर्णय झाला नसला तरी आघाडीतील जागा वाटप आणि म तदारसंघ अदलाबदलनंतर मूर्तिजापूर मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, मूर्तिजा पूरसह अकोला पूर्व किंवा पश्‍चिम या दोन मतदारसंघापैकी एक मतदार संघ राष्ट्रवादीला मिळावा, यासाठीचे प्रयत्न जिल्हा नेत्यांकडून केले जात असून, हा निर्णय मात्र पक्षश्रेष्ठींनीच सोडवावा; पण या दोनपैकी एक मतदारसंघ द्यावाच, अशी आग्रही या भूमिका नेत्यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांनी मूर्तिजापूर म तदारसंघाचा पाया राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला असल्याचे वक्तव्य क रून त्या मतदारसंघावर राकाँचाच दावा ठोकला आहे. तथापी निर्णय मात्र पक्षनेतृत्वच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

** आघाडीसाठी प्रफुल पटेल अनुकूल
धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम असावी, यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल अनुकूल असून, ९ व १0 सप्टेंबर रोजी आघाडीबाबत दिल्लीत सोनिया गांधी व शरद पवार यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत प्रफुल पटेल सहभागी होणार आहेत.

Web Title: Two constituencies in the block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.