दोन भावंडाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: August 27, 2016 03:06 IST2016-08-27T03:06:31+5:302016-08-27T03:06:31+5:30

विनापरवाना कीटकनाशके केली होती तयार!

Two brothers' anticipatory bail application rejected | दोन भावंडाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

दोन भावंडाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अकोला, दि. २६: औद्योगिक वसाहतमधील एस.आर.पी. अँग्रो प्रोडक्ट्सच्या दोन गोदामांमध्ये अनधिकृतपणे रासायनिक खते, पीक वाढ संजीवके आणि कीटकनाशके बनविणार्‍या कारखान्यावर एमआयडीसी पोलीस आणि कृषी विभागाने छापेमारी केली होती. हा बनावट कारखाना चालविणारे फरार झाले असून त्यांनी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली; मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपी भावंडाचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला स्थित वसाहतमधील फेज क्रमांक चारमधील प्लॉट नं. २२/२ येथे विनापरवाना रासायनिक खते बनविण्यात येत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस आणि कृषी विभागाने त्या ठिकाणी छापा टाकला. हा कारखाना रमेश पाचंगे आणि गजानन पाचंगे यांचा असल्याचे कृषी अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीत समोर आले आहे. कारखान्याची तपासणी केली असता कारखान्यात रिकाम्या बाटल्या, पाच ते सहा प्लास्टिकचे ड्रम आणि विविध साहित्यांच्या नावांचे स्टिकर्स मिळून आले. रासायनिक औषधी, खते, द्रव्यही पथकाने जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या साठय़ाची किंमत साडेआठ लाख रुपये होती. या कारखान्यात ह्युमिक अँसिड, अमोनियम सल्फाइड अँसिड, अमोनिनिमय अँसिड, सोडियम मेटाबाश सल्फेड, पोस्टिक पोटॅश यासह रासायनिक द्रव्य मिळून आले होते. सदर पीक वाढ संजीवके आणि कीटकनाशके पुणे येथे बनविण्यात येत असल्याचे बोगस स्टिकर्सही या कारखान्यातून जप्त करण्यात आले होते. कारखान्यात प्लास्टिक ड्रममध्ये रासायनिक द्रव्यांचे मिश्रणही होते. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी गजानन पाचंगे व रमेश पाचंगे यांच्यावरविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर या दोन्ही भावंडांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. या दोघांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर रमेश पाचंगे आणि गजानन पाचंगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून या दोघांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आता या दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Web Title: Two brothers' anticipatory bail application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.