दोघा लाचखोरांची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: May 29, 2014 23:24 IST2014-05-29T20:52:59+5:302014-05-29T23:24:09+5:30
शेतकर्याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या दोघा लाचखोरांची कारागृहात रवानगी केली.

दोघा लाचखोरांची कारागृहात रवानगी
अकोला : वाडेगावचा मंडळ अधिकारी आणि नकाशीच्या तलाठ्यासाठी शेतकर्याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या दोघा लाचखोरांना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघाही लाचखोरांची कारागृहात रवानगी केली. प्रमुख सूत्रधार वाडेगावचा मंडळ अधिकारी व तलाठ्याचा पोलिस शोध घेत आहेत. माझोडचे शेतकरी गजानन सुधाकर हागे (५५) यांचे नावे असलेल्या भरतपूर शिवारातील साडेसहा एकर शेतीच्या सातबारामध्ये पत्नी प्रमिला हागे हिच्या नावाची नोंद न करण्यासाठी त्यांना वाडेगावचा मंडळ अधिकारी संतोष कर्णेवार (परिवार कॉलनी) आणि नकाशीचा तलाठी अमित सुधाकर सबनिस (परिवार कॉलनी) या दोघांनी ७0 हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअखेर ३५ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. गजानन हागे यांनी २३ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पैसे देण्याचा दिवस ठरल्यानंतर बुधवारी संतोष कर्णेवार आणि अमित सबनिस यांनी कोतवाल गीरधर श्रीधर घोगरे (भरतपूर) आणि विजय गजानन काळे (भरतपूर) या दोघांना माझोड येथे पैसे घेण्यासाठी पाठविले. त्यांनी ३५ हजार रुपयांची हागे यांच्याकडून लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दोघांना अटक केली. दोघा आरोपींना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघाही लाचखोरांची कारागृहात रवानगी केली.