दोन दुचाकींची धडक,एक ठार
By Admin | Updated: April 23, 2017 01:09 IST2017-04-23T01:09:57+5:302017-04-23T01:09:57+5:30
घुसरजवळ दोन दुचाकीची समोरासमोरा धडक झाल्याने एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

दोन दुचाकींची धडक,एक ठार
अकोला : घुसरजवळ दोन दुचाकीची समोरासमोरा धडक झाल्याने एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. वृत्त लिहिस्तोवर अकोट फैल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता.
अकोल्यावरून दोनवाडा येथे दुचाकीने संजय जानराव मेश्राम (३७) व संदीप रमेश आडे (३0) हे दोघे एका दुचाकीवर जात होते. त्यांच्यासमोरून दुसरी दुचाकी आल्याने या दोन्ही दुचाकी एकमेकांना समोर धडकल्या. या अपघातात संदीप आडे हा ठार झाला असून त्यांच्यासोबत असलेले संजय मेश्राम हे गंभीर जखमी झाले आहेत. तर समोरील दुचाकीवर दोघेही जखमी झाल्याची माहिती असून वृत्त लिहिस्तोवर अकोट फैल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता.