मधमाशांच्या हल्ल्यात दोन जमखी
By Admin | Updated: March 18, 2017 02:28 IST2017-03-17T20:52:16+5:302017-03-18T02:28:34+5:30
दोघांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना १७ मार्च रोजी दुपारी घडली. यामध्ये कोल्हापुर येथील भंते गंभीर जखमी झाले आहेत.

मधमाशांच्या हल्ल्यात दोन जमखी
अंदुरा : येथील पूर्णा नदीवर आंघोळीसाठी जाणाऱ्या दोघांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना १७ मार्च रोजी दुपारी घडली. यामध्ये कोल्हापुर येथील भंते गंभीर जखमी झाले आहेत.
अंदुरा येथील पूर्णा नदीवर कोल्हापुरवरून आलेले भंते नागसेन हे नदीवर आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्याने ते जागीच कोसळले. गावातील रविंद्र वानखडे, संतेद्र वानखडे, राहुल उमाळे, राजु वाकोडे, राजु विरघट आदींना याविषयी माहिती मिळताच त्यांनी भंतेना नदीतून बाहेर काढले. तसेच उपचारासाठी अकोला येथे पाठवले. पुलावर जात असलेल्या आणखी एकावर मधमाशांनी हल्ला केल्याने ते सुद्धा जखमी झाले.