तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणारे दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:26+5:302021-04-29T04:14:26+5:30

अकोला : जिल्ह्यातून तडीपार केलेले दोन आरोपी हरिहरपेठ येथे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष ...

Two arrested for violating Tadipar order | तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणारे दोघे अटकेत

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणारे दोघे अटकेत

अकोला : जिल्ह्यातून तडीपार केलेले दोन आरोपी हरिहरपेठ येथे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने छापा टाकून दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध जने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिहरपेठ येथील रहिवासी शेख जुनेद शेख निजाम आणि शेख कासम ऊर्फ गुड्डू शेख अनिस या दोन आरोपींना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र तरी हे दोघेही हरिहरपेठ येथे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी सापळा रचून बुधवारी दुपारी या दोघांनाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two arrested for violating Tadipar order