इर्शाद हत्याकांडातील दोन आरोपींना कोठडी
By Admin | Updated: September 17, 2014 02:41 IST2014-09-17T02:41:23+5:302014-09-17T02:41:23+5:30
इर्शाद हत्याकांडातील दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ.

इर्शाद हत्याकांडातील दोन आरोपींना कोठडी
अकोला: इर्शाद हत्याकांड घडल्यानंतर आरोपी मोहम्मद आजम मोहम्मद हबीब आणि मोहम्मद हनीफ मोहम्मद हबीब हे दोघे दोन वर्षांंपासून फरार होते. १0 सप्टेंबर रोजी दोघेही आरोपी न्यायालया त शरण आले होते. दोघा आरोपींच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
१२ जुलै २0१२ रोजी कागजीपुर्यातील मोहम्मद इर्शाद यांची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद मुनाफ मोहम्मद हनीफसह १५ आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी मोहम्मद अनजार मोहम्मद हबीब, मोहम्मद इरफान ऊर्फ कालू मोहम्मद कासम आणि मोहम्मद आमीर मोहम्मद आजम यांना अटक केली होती. दोघा आरोपींच्या आत्मसर्मपणामुळे आता आरोपींची संख्यावर सहा झाली आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपी अद्यापही फरार आहेत.