तेल चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपी कारागृहात

By Admin | Updated: November 4, 2016 02:27 IST2016-11-04T02:27:48+5:302016-11-04T02:27:48+5:30

चोरट्यांनी केला होता २७ बॅरल पळून नेण्याच्या प्रयत्न.

Two accused in the case of oil theft in jail | तेल चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपी कारागृहात

तेल चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपी कारागृहात

अकोला, दि. ३-एमआयडीसी क्रमांक ३ मधील समीर ऑइल इंडस्ट्रीजमधील २७ बॅरल तेल चोरून ते एका ट्रकमध्ये भरून नेणार्‍या नारायण यादव आणि बबलू ऊर्फ अत्यानंद यादव यांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची कारागृहात रवानगी केली. एमआयडीसी क्रमांक ४ मधील समीर ऑइल इंडस्ट्रीज येथून बबलू यादव आणि नारायण यादव हे दोन चोरटे चार लाख रुपयांचे २७ बॅरल खाद्य तेल एका ट्रकमध्ये २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भरत होते. या चोरट्यांनी २७ बॅरल ट्रकमध्ये ठेवल्यानंतर ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच यावेळी गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करताच दोन्ही चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपयांच्या तेल चोरीची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांकडून चार लाख रुपयांचे तेल आणि चार लाख रुपयांचा ट्रक जप्त केला होता.

Web Title: Two accused in the case of oil theft in jail