शस्त्रसाठा प्रकरणातील दोघा आरोपींना जामीन

By Admin | Updated: August 31, 2014 01:16 IST2014-08-31T01:16:36+5:302014-08-31T01:16:54+5:30

अकोला येथील शस्त्रसाठा जप्ती प्रकरणातील आरोपींना जामीन.

Two accused in the arms case | शस्त्रसाठा प्रकरणातील दोघा आरोपींना जामीन

शस्त्रसाठा प्रकरणातील दोघा आरोपींना जामीन

अकोला: तलवार, चाकू व फायटर या शस्त्रसाठय़ासह गजाआड केलेल्या उमरावसिंह बावरी, त्याचा मुलगा रणजितसिंह यांना शनिवारी न्यायाधीश बोस यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करीत, त्यांची जामिनावर सुटका केली.
शुक्रवारी रात्री खदान पोलिसांनी आदर्श कॉलनीतील एका घरावर छापा घालून १२ धारदार तलवारी, ३ अँटोमॅटिक चाकू, ३ खंजीर व ५ फायटर जप्त करून आरोपी उमरावसिंह बावरी (६५) व त्याचा मुलगा रणजितसिंह बावरी (२५) याला अटक केली होती. शनिवारी दोघा आरोपींनी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना तीन ते चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी केली; परंतु आरोपींच्या वकिलांनी ही मागणी फेटाळून लावत, पोलिसांनी आरोपींकडून शस्त्र जप्त केलेले आहेत, त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देऊ नये, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करीत, त्याची जामिनावर सुटका केली.

Web Title: Two accused in the arms case