लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आजार बरा करण्याच्या नावाखाली सिंधी कॅम्पमधील युवतीला दीड लाख रुपयांनी गंडवणार्या महिलेने सराफा व्यावसायिकांना विनापावती सोने विकल्याची माहिती समोर आली आहे. सोने गहाण आणि विकत घेणार्या सराफा व्यावसायिकांची आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.सिंधी कॅम्पमधील पक्की खोली येथील रहिवासी काजल कमलकुमार चंदवानी (२७) या युवतीच्या घरी गत १५ वर्षांपूर्वी निमवाडी परिसरातील रहिवासी आरती संतोष खरे नामक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. आपल्याला काळी जादू येते. असे म्हणून आरतीने काजलला ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. काजलचे लग्न झाल्यानंतरही आरतीने तिच्या घरी जाऊन या ३00 ग्रॅमचे दागिने धमकी देऊन आणल्याची माहिती आहे. त्यानंतर काजलने पोलिसात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून आरती खरे हिला अटक केली. आरोपी महिला पोलीस कोठडीत असून, ितने उकळलेल्या रुपयांपैकी काही रक्कम व्याजाने दिली, तर काही सोने सराफा व्यावसायिकांना विकले व काही गहाण ठेवले. पोलिसांनी चौकशीदरम्यान आरोपी महिलेकडून सराफा दुकानांच्या पावत्या जप्त केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी सराफा व्यावसायिकांची चौकशी सुरू केली आहे.
विनापावती सोने विकत घेणारे सराफा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:38 IST
अकोला : आजार बरा करण्याच्या नावाखाली सिंधी कॅम्पमधील युवतीला दीड लाख रुपयांनी गंडवणार्या महिलेने सराफा व्यावसायिकांना विनापावती सोने विकल्याची माहिती समोर आली आहे. सोने गहाण आणि विकत घेणार्या सराफा व्यावसायिकांची आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
विनापावती सोने विकत घेणारे सराफा अडचणीत
ठळक मुद्देयुवतीस काळी जादूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकरण