वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:53+5:302021-07-17T04:15:53+5:30

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र पाऊस होत आहे. वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे ...

Turn off the mobile as soon as the power goes out; Stay away from trees! | वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!

वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र पाऊस होत आहे. वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही. मात्र, काही स्थाने इतर ठि‍काणांपेक्षा सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?

अकोला जिल्ह्यामध्ये केवळ एकाच ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात वीज अटकाव यंत्रणा आहे.

मात्र, जिल्ह्यात इतर कुठल्याही ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

वीज पडण्याची माहिती होण्यासाठी आयआयटीएमकडून दामिनी नावाचे ॲप विकसित करण्यात येत आहे.

कोणाला किती मिळाली नुकसानभरपाई

सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीचेच वज्राघातामुळे नुकसान होते. बाहेर असलेल्या व्यक्ती वज्राघातामुळे जखमी होतात किंवा मृत्यू पावतात.

या मृत व्यक्तींना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्यात आली आहे, तर दुधाळ जनावरासांठी प्रत्येकी ३० हजार व बैल मृत पावल्यास ३० हजार रुपये देण्यात येतात.

वीज पडल्याने झालेले मृत्यू

वर्ष मनुष्यबळी जनावरांचा मृत्यू

२०१८ ० ०

२०१९ ८ २

२०२० २ १

२०२१ (१५ जुलैपर्यंत) २ १

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी

विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलित यंत्रे बंद ठेवण्यात यावीत. वीज चमकत असताना व घराबाहेर असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवावेत. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे. गडगडाटासह वादळ आल्यास उंच जागांवर, मोकळ्या जागा, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टाॅवर्स, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी टाळावे. घरात असल्यास विद्युत उपकरणांना हात लावू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Turn off the mobile as soon as the power goes out; Stay away from trees!