तूर, हरभरा, सोयाबीन भाव वधारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:19 AM2021-05-07T04:19:04+5:302021-05-07T04:19:04+5:30

शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीकरिता आणण्याची थोडीफार मुभा असली तरी, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी अनेकजण बाजार समितीकडे पाठ फिरवित आहेत. अनेकांना ...

Tur, gram, soybean prices go up! | तूर, हरभरा, सोयाबीन भाव वधारले!

तूर, हरभरा, सोयाबीन भाव वधारले!

Next

शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीकरिता आणण्याची थोडीफार मुभा असली तरी, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी अनेकजण बाजार समितीकडे पाठ फिरवित आहेत. अनेकांना आर्थिक संकटात दिवस काढावे लागत आहेत. अशा स्थितीत बाजार समितीमध्ये हरभरा ५ हजार १६५, तूर ६ हजार ९०० तर सोयाबीन ७ हजार ३३५ जास्तीत जास्त भावापर्यंत विकल्या गेले आहेत. शेतमालाची आवक चांगली आहे. मात्र निर्यात होत नसल्याने व्यापाऱ्यांकडे मालाची साठवणूक झाली आहे. सद्य स्थितीत शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत असले तरी, मात्र या शेतमालावर पुढील प्रक्रिया होऊन बाजारात विक्री होणारे पदार्थ तयार होत नसल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर दिसून येत आहे.

बेसन, डाळींचे दर आवाक्याबाहेर!

बाजारपेठेत बेसन, सोयाबीनचे पदार्थ, डाळींचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यास शेतकऱ्यांना अजूनही चांगला भाव मिळू शकेल. दरम्यान खाद्यतेलांचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. त्यामुळे यावर्षी भुईमूग पिकाला सुध्दा चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठेमधे काळाबाजार होऊन निकृष्ट दर्जाचे व कालबाह्य झालेल्या वस्तू विक्री होऊ नये याकरिता प्रशासनाने नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

Web Title: Tur, gram, soybean prices go up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.