तूर, हरभऱ्याच्या दरात घसरणच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 04:05 PM2020-03-09T16:05:52+5:302020-03-09T16:06:14+5:30

शेतकऱ्यांना १ हजार २७५ रुपये या कमी दराने व्यापाºयांना हरभरा विकावा लागत आहे.

Tur, gram rate is falling! | तूर, हरभऱ्याच्या दरात घसरणच!

तूर, हरभऱ्याच्या दरात घसरणच!

Next

- राजरत्न सिरसाट

अकोला : शासनाने पीक कर्जमुक्तीचा धडाका लावला असताना दुसरीकडे अधारभूत किमतीपेक्षा तूर, हरभºयाचे दर कमी झाले असून, कापूस खरेदी केंद्रावरही मोजणी होत नसल्याने ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चणा) प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये हमीदर जाहीर केले;परंतु बाजारात दर कोसळले असून, शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना १ हजार २७५ रुपये या कमी दराने व्यापाºयांना हरभरा विकावा लागत आहे. यात उत्पादन खर्च निघत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. हरभरा काढणी हंगामाच्या दोन आठवडे अगोदर तूर काढणीचा हंगाम संपला आहे. शेतकºयांनी तूर विक्रीस काढली आहे. तुरीची आधारभूत किंमत प्रति क्ंिवटल ५,८०० रुपये आहे. तथापि, आजमितीस बाजारात यापेक्षा ९०० रुपये कमी किमतीने तूर विकावी लागत आहे. तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करणे हे तर आहेच, याशिवाय सर्व कागदपत्रे आणणे त्यातही १२ टक्केपेक्षा अधिक आर्द्रता नको, अशा सर्व समस्या असल्याने राज्यातील तूर उत्पादक शेतकरी खासगी बाजाराला पसंती देत आहेत. एकट्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी २,५०० क्ंिवटलवर तूर आणि सरासरी ५,५०० क्ंिवटल हरभरा आवक सुरू आहे. उडिदाची आधारभूत किंमत प्रति क्ंिवटल ५,७०० रुपये आहे. बाजारात किंमत सरासरी केवळ २,६०० रुपये आहे. म्हणजेच ३,१०० रुपये कमी किमतीत शेतकºयांना उडीद विकावा लागत आहे. मुगाचा एमएसपी ७ हजार ५० रुपये आहे. तथापि, बाजारात सरासरी ६ हजार रुपये दर असल्याने १ हजार रुपये कमी दराने शेतकºयांना विक्री करावी लागत आहे. कापूस नगदी पीक आहे; परंतु कापसाची आवक वाढल्याची सबब पुढे करीत शासकीय कापूस खरेंद्र केंद्रही आठ ते दहा दिवस बंद राहणार आहेत. परिणामी, सर्व शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर कापसाचे ट्रक, ट्रॅक्टर रांगेत आहेत. सद्यस्थितीत मुला-मुलींचे लग्न, वर्षभर केलेली उसनवारी, शेतकरी परत करीत असतात; परंतु हाती पूरक पैसाच पडत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
 

 

Web Title: Tur, gram rate is falling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.