तुकडोजी महाराजांच्या पादुका आज अकोल्यात!

By Admin | Updated: July 14, 2017 01:35 IST2017-07-14T01:35:25+5:302017-07-14T01:35:25+5:30

अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार, १४ जुलै रोजी राजराजेश्वर नगरीत आगमन होत आहे.

Tukdoji Maharaj's Paduka today in Akolat! | तुकडोजी महाराजांच्या पादुका आज अकोल्यात!

तुकडोजी महाराजांच्या पादुका आज अकोल्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार, १४ जुलै रोजी राजराजेश्वर नगरीत आगमन होत आहे.
दुपारी ४ वाजता डाबकी मार्गावरील कॅनॉलजवळ साई गजानन गुरूदेव सेवा भजन मंडळाच्यावतीने पादुकांचे स्वागत व पूजा होईल. त्यानंतर वाजत-गाजत दिनकर पिंजरकर यांच्या निवासस्थानी असलेल्या प्रार्थना मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर सामुदायिक प्रार्थना होईल. त्यानंतर राजराजेश्वर मंदिरात व नंतर गोरक्षण मार्गावरील कुणबी समाज मंगल कार्यालयात त्या आणल्या जातील. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन दिनकर पिंजरकर, गणेश चोंडेकर, विजय मुंडगावकर, अमोल मुंडगावकर, उदय मुंडगावकर, प्रसाद पिंजरकर, चंद्रशेखर चतारे, गजानन भिरड, बाबाराव देशमुख, रामधन शिरसाट, प्रदीप हरणे, अमित पाठक, अ‍ॅड. रोहित खैरे, दिलीप मोरे, पवन सिडाम, सुनील राऊत, विष्णू नागलकर, सुनील दौंड, गजानन इचे यांनी केले आहे.

Web Title: Tukdoji Maharaj's Paduka today in Akolat!