शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर येथे बार मालकास जीवे मारण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:36 IST

मंगरूळपीर : शहरातील राजेश वाईनबार येथे २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिघांनी दारु न मिळाल्याच्या कारणावरून बार मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : शहरातील राजेश वाईनबार येथे २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिघांनी दारु न मिळाल्याच्या कारणावरून बार मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत दाखल फिर्यादीवरून रात्री उशीरा आरोपींविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच दोघांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन प्रकाश परळीकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की पंकज मुकूंद रघुवंशी, योगेश एकनाथ गादेकर व गोट्या किशोर रघुवंशी (सर्व रा. मंगरुळपीर) यांनी २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आपणाकडे दारूची मागणी केली; परंतु बार बंद झाल्याने ती देता येणार नसल्याचे सांगितले असता, आरोपींनी दोन्ही हात पकडून तथा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व दगड फेकही केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन मंगरुळपीर पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ४२७ भादंविनुसार गुन्हे दाखल केले. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिमMangrulpirमंगरूळपीर