न घडलेल्या चोरीची ‘सत्यकथा’

By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T23:23:22+5:302014-12-09T23:23:22+5:30

टी.व्ही. मालिकेचा बालकावर असाही प्रभाव

'Truth story' | न घडलेल्या चोरीची ‘सत्यकथा’

न घडलेल्या चोरीची ‘सत्यकथा’

धनंजय कपाले/ वाशिम
वाशिम : दुपारचे दोन वाजलेत. अचानक कॉलनीमध्ये एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येतो. धावा .. धावा.. चोर आलेत. अन् काही क्षणातच नागरिक जमा होतात. घराचे चॅनेल गेट तोडायला सुरूवात करतात. तेवढय़ात त्यांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरामधुन बाहेर पडतो अन् जमलेल्या नागरिकांना चोर गच्चीवरून उडी मारून पळून गेल्याचे सांगतो. ही चित्तथरारक कहाणी एका १२ वर्षाच्या मुलाने तयार केल्याचा भांडाफोड वाशिम शहर पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी केला.
वाशिम शहरातील लाखाळा परिसरात एका शिक्षकाचे कुटूंब वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका म्हणुन शहरातच कर्तव्यावर आहेत. दैनंदिन दिनचर्ये प्रमाणे बारा वर्षीय सत्यमचे (काल्पनीक नाव) आई-वडील आपल्या कर्तव्यावर सकाळी निघुन गेलेते. यावेळी सत्यम सुध्दा पाठीवर दप्तर टाकुन घराबाहेर पडला. शाळेमध्ये जाण्याचा कंटाळा आला म्हणुन शाळेला ह्यदांडीह्ण मारून सत्यम घरी परतला. कुलूपाची चावी ठेवण्याची विशिष्ठ जागा सत्यमला माहिती होती. सत्यमने घराचे कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केला.
ऐरवी दुपारी ४ वाजता घरी येणारी सत्यमची आई आज मंगळवारला दुपारी २ वाजताच घरी आली. घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याच्या आईला घरामध्ये चोर शिरल्याची भिती निर्माण झाली. आईने आरडा ओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावुन घेतले.
पोलिस उपनिरिक्षक जाधव व जमादार सिध्दार्थ राऊत यांना सत्यमने घरामध्ये चोरीचा प्रयत्न कशाप्रकारे झाला व चोरट्याचा प्रयत्न कसा हाणुन पाडला याची माहिती देत होता. चोरट्याचे वर्णन विचारण्यासाठी डीबी पथक प्रमुख उदय सोयस्कर, राजेश बायस्कर, सुनिल पवार यांनी चिमुकल्याची एकांतात विचारणा करणे सुरू केले. उलट सुलट प्रश्नाच्या भडिमाराने सत्यमला पोलिसांसमोर सत्य सांगणे भाग पडले. साहेब मी शाळेला दांडी मारली मात्र ही गोष्ट आई-वडीलांना कळली तर मला शिक्षा होईल. या भितीपोटी घरामध्ये चोर आल्याची ह्यस्टोरीह्ण तयार केली. अशी कबुली सत्यमने पोलिसांना दिली. मात्र, माझी ही बनावट ह्यस्टोरीह्ण माझ्या आई वडीलांना ह्यप्लीजह्ण सांगू नका ! अशी केविलवाणी विनंतीही सत्यमने पोलिसांना केली. सत्यमच्या बनावट चोरीचा उलगडा झाल्यानंतर सर्व नागरिकांनी व पोलिसांनीही सुटकेचा श्‍वास घेतला. अन् एकच हशा पिकला. टी.व्ही. सिरीयलमुळे लहान बालके त्यातील काय घेतील व काय नाही हे या घटनेवरून दिसून येते.

Web Title: 'Truth story'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.