शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू ट्रक गेला विद्यार्थीनीच्या हातावरून; खांद्यापासून हात निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:43 IST

मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली.

ठळक मुद्दे केवळ दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून विद्यार्थीनी वाचली असली, तरी ट्रक हातावरून गेल्याने तीचा संपूर्ण हात निकामी झाला. ही घटना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी घडली.ट्रक हातावरून गेल्यामुळे प्रियाचा उजवा हात चेंदामेंदा झाला असून, तो खांद्यापासून संपूर्ण निकामी झाला.

मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून विद्यार्थीनी वाचली असली, तरी ट्रक हातावरून गेल्याने तीचा संपूर्ण हात निकामी झाला. येथील  लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी घडली.प्रिया गजानन वानखडे (१५) ही बुधवारी सकाळी शाळेतून सायकलद्वारे घरी परत जात होती. लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर आॅटोरिक्षा मधून उतरणारºया व्यक्तीचा धक्का लागल्याने ती सायकल वरुन खाली पडली. नेमका त्याच वेळी विरुद्ध दिशेने येत असलेला एम.पी.एच.जी. ७०७२ क्रमांकाचा ट्रक प्रियाच्या हातावरून गेला. ट्रक हातावरून गेल्यामुळे प्रियाचा उजवा हात चेंदामेंदा झाला असून, तो खांद्यापासून संपूर्ण निकामी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रियाला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. मुळची कामठा येथील रहिवासी असलेली प्रिया ही सेंट आॅन्स स्कूल मध्ये इयत्ता नववीची विद्यार्थीनी असून, ती शिक्षणासाठी आपल्या मोठ्या वडीलांकडे मूर्तिजापूर येथे राहते. या प्रकरणी ट्रक चालक गणेश गोविंदराव पानसे रा. अचलपूर याला मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. सदर ट्रक मूर्तिजापूर येथील मूलचंद किराणा दुकानचा माल घेऊन आला होता. वृत्त लिहिस्तोवर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.नागरिकांनी दिला ठिय्यामूर्तिजापूर येथील मुख्य रस्त्याचे काम पाच महिन्यांपासून अतिशय संथ गतीने चालू असून, एकेरी वाहतुक सुरु आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. संबंधीत जबाबदार अधिकाºयावर व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी घटनास्थळी दोन तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात शहर ठाणेदार यांनी मध्यस्थी करुन आंदोलकांना शांत केले. या अपघाताला संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. संजय नाईक, पंडित वाघमारे, रवि राठी, अप्पू तिडके, टाले सर, सुहास सर, अ‍ॅड विपीन अग्रवाल, संजय निस्ताने, शिवा गव्हाणे, मनोज जावरकर, संजय झारोडीया, संजय वानखडे, संजय पालीवाल, संजय तिहीले, अंगद ठाकरे, नितीन वर्मा, मनोज वर्मा, अक्षय लकडे, मोहन वसूकार हे आंदोलनात सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात