पैशांच्या वादातून ट्रकचालकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 19:36 IST2017-04-26T19:36:18+5:302017-04-26T19:36:18+5:30
मूर्तिजापूर : पैशांच्या वादातून ट्रक क्लीनरने चालकाची लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची घटना मूर्तिजापूर शहराजवळील ढाब्याजवळ २६ एप्रिल रोजी सकाळी घडली.

पैशांच्या वादातून ट्रकचालकाची हत्या
आरोपी क्लीनर फरार, मूर्तिजापूर शहराजवळील घटना
मूर्तिजापूर : पैशांच्या वादातून ट्रक क्लीनरने चालकाची लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची घटना मूर्तिजापूर शहराजवळील ढाब्याजवळ २६ एप्रिल रोजी सकाळी घडली. हत्या केल्यानंतर क्लीनरने घटनास्थळावरून पळ काढला.
ट्रकचालक अजहर शेख अकबर अली रा. कटरिया जिल्हा बस्ती भानापूर याचा क्लीनरसोबत पैशांवरून वाद निर्माण झाला. या वादातून क्लीनरने अजहर शेख याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. या मारहाणीत अहजर शेख याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. क्लीनरने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतकच्या शरीराला ट्रकच्या केबीनमध्ये सीटखाली लपवून ठेवले. समई ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक हनिफ भाई बकानेर गुजरात यांचा ट्रक क्रमांक जी. टी. ०३ ए. झेड. ११३३ हे ट्रक तीन चार दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे त्यांनी बी. जे. शंकर प्रजापती यांना ट्रकचा शोध घेण्यासाठी सांगितले. या ट्रकचा शोध घेतला असताना ट्रकच्या केबीनमध्ये चालकाचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी बी. जे. प्रजापती यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी क्लीनरविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय गणेश कोथळकर करीत आहे.