शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसीड वाहुन नेणारा ट्रक उलटला : चालक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:47 IST

बोरगाव मंजू (अकोला): अ‍ॅसीडची वाहून नेणारा ट्रक उलटल्याने चालक जागीच ठार तर क्लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना १९ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबी नजीक घडली.

बोरगाव मंजू (अकोला): अ‍ॅसीडची वाहून नेणारा ट्रक उलटल्याने चालक जागीच ठार तर क्लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना १९ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबी नजीक घडली. देवेंद्र बबलू रजत रा.मध्यप्रदेश असे मृतक चालकाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकमधील अ‍ॅसीड चालकाच्या अंगावर पडल्याने तो भाजल्या गेला.बोरगाव मंजू कडुन नागपूरकडे मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ०४ एचडी ४१११ हा अ‍ॅसिडचे डब्बे वाहुन नेत होता. राष्ट्रीय महामार्गावर दाळंबी जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाउन उलटला. या अपघातात कॅबीनमध्येच अडकून चालक देवेंद्र बबलू रजत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर क्लिीनर बलराम कुसाराम हा गंभीर जखमी झाला.या अपघातानंतर ट्रकमधील अ‍ॅसीड चालकाच्या अंगावर पडल्याने तो पूणपणे भाजल्या गेला होता. घटनेची माहीती बोरगाव मंजु पोलिसांना मिळताच घटनास्थळावर ठाणेकर संजीव राऊत सह पोलीसांनी सदर अडकून पडलेल्या वाहन चालकास मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालय अकोला येथे उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले. दरम्यान संत गाडगे बाबा आपत्कालीन पथक,कोळंबी, कुरणखेड येथील ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांना सहकार्य केले. या घटनेचा पंचनामा करून बोरगावमंजू पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार संजीव राउत पोलीस करीत आहेत. (वार्ताहर) 

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात