ट्रकची दुचाकीला धडक; महिला ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:43+5:302021-07-24T04:13:43+5:30

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी बस थांब्यानजीक ट्रकच्या धडकेत एक दुचाकीवरील महिला ...

Truck hits two-wheeler; Woman killed, two injured | ट्रकची दुचाकीला धडक; महिला ठार, दोन जखमी

ट्रकची दुचाकीला धडक; महिला ठार, दोन जखमी

Next

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी बस थांब्यानजीक ट्रकच्या धडकेत एक दुचाकीवरील महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, माधुरी महल्ले असे मृतक महिलेचे नाव आहे.

बोरगाव मंजू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधलम येथील रवींद्र किसन महल्ले (४३), पत्नी माधुरी रवींद्र महल्ले (३८), मुलगा दत्ता रवींद्र महल्ले (१२) हे दुधलम येथून दुचाकी क्रमांक (एमएच ४० जी ७२८६) ने काटेपूर्णा येथे जात होते. कोळंबी बस थांब्यावरील गतिरोधक ओलांडत असताना, मूर्तिजापूरहून अकोलाकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच ४० बी.एल. ८३८७) या ट्रकच्या खाली सापडून माधुरी रवींद्र महल्ले यांचा चिरडून घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार रवींद्र किसन महल्ले व त्यांचा मुलगा दत्ता रवींद्र महल्ले हे दोघे सुदैवाने बचावले असून, किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, काटेपूर्णा येथील वंदेमातरम आपत्कालीन पथक, ठाणेदार सुनील सोळंके, पोलीस कर्मचारी दीपक कानडे, फहीम शेख, नामदेव केंद्रेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील रुग्णालयात आणला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून, घटनेतील चालकासह ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.

Web Title: Truck hits two-wheeler; Woman killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.