ट्रकची दुचाकीस धडक; १ ठार

By Admin | Updated: May 16, 2014 21:16 IST2014-05-16T20:07:59+5:302014-05-16T21:16:03+5:30

कुरूम जवळ भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक; एक ठार तर एक जखमी.

Truck hits two-wheeler; 1 killed | ट्रकची दुचाकीस धडक; १ ठार

ट्रकची दुचाकीस धडक; १ ठार

कुरुम(अकोला): भरधाव ट्रकने एका दुचाकीस धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर कुरुमनजीकच्या मालाणी पे्रसिंगजवळ बुधवारी दुपारी घडली. प्राप्त माहितीनुसार, मनोज श्रीकिसन जोशी (३५) व अरविंद श्रीखंडे (२८) दोघेही रा. अमरावती हे अमरावतीहून मूर्तिजापूरकडे बजाज पल्सर मोटारसायकलवर येत होते. कुरुमनजीकच्या मालाणी प्रेसिंग जीनजवळ आले असता समोरून येणार्‍या आर.जे. ०४- ६५५९ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात मनोज श्रीकिशन जोशी यांचा मृत्यू झाला तर आशिष श्रीखंडे हे गंभीर जखमी झाले. आशिष श्रीखंडे यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माना पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वृत्तलिहिस्तोवर ट्रक चालकास अटक करण्यात आली नव्हती. ठाणेदार संजय हुड आणि एएसआय कांता प्रसाद मिश्र पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Truck hits two-wheeler; 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.