राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:58 PM2020-09-11T17:58:00+5:302020-09-11T17:58:08+5:30

कारमधील दोघे गंभीर जखमी झाले.

Truck hits car on national highway; Both injured | राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

googlenewsNext

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबानजीक भरधाव ट्रकने कारला धडक दिली. यात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोलाकडून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या एमएच १२ एफ झेड ४५१५ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने समोरून येणाºया एमएच ४0 बीजी ४८९५ क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली. कारमध्ये प्रवासी दिनेश बाळकृष्ण अत्रे (४0 रा. बडनेरा, जि. अमरावती), यशवंत हरिस्वामी अत्रे (३५ रा. नागपूर) आणि विनोद रामकृष्ण बेदरकर (रा. दहीगाव रंगाळी) होते. अपघातात दिनेश अत्रे व चालक विनोद बेदरकर हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हरिश गवळी, पोलीस कर्मचारी अरुण गोपनारायण, संजय इंगळे, लक्ष्मण मोरे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. अपघातात कारचे नुकसान झाले. बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Truck hits car on national highway; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.