शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पातूर घाटात मोटारसायकलला ट्रकची धडक, महिला ठार, पती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 15:06 IST

पातूर (जि. अकोला): वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून पातूरकडे येताना रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करून थांबलेल्या एका दाम्पत्यास पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना पातूर घाटात शुक्रवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देसतीष ज्ञानबा सोमटकर (३०) हे त्यांची पत्नी वैशाली (२५) हिच्यासोबत मोटारसाकलवरून (क्र. एम.एच. ३७ एन. ०५५१) पातुरकडे येत होते. सतीष सोमटकर यांनी एका टिप्परच्या मागे आपली दुचाकी उभी केली व दोघेही दुचाकीवरच बसून वाहतुक कोंडी फुटण्याच वाट पाहत होते. मालेगावकडून पातूरकडे येत असलेल्या एम.एच. ३७ टी. ५१५१ क्रमांकाच्या ट्रकने या दोघा दाम्पत्यास जोरदार धडक दिली.

पातूर (जि. अकोला): वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून पातूरकडे येताना रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करून थांबलेल्या एका दाम्पत्यास पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना पातूर घाटात शुक्रवारी सकाळी घडली. म्हसोबा मंदिराजवळ एक ट्रक नादुरुस्त झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. यावेळी मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथील रहिवासी सतीष ज्ञानबा सोमटकर (३०) हे त्यांची पत्नी वैशाली (२५) हिच्यासोबत मोटारसाकलवरून (क्र. एम.एच. ३७ एन. ०५५१) पातुरकडे येत होते. घाटात वाहतुक कोंडी झालेली पाहून सतीष सोमटकर यांनी एका टिप्परच्या मागे आपली दुचाकी उभी केली व दोघेही दुचाकीवरच बसून वाहतुक कोंडी फुटण्याच वाट पाहत होते. यावेळी मालेगावकडून पातूरकडे येत असलेल्या एम.एच. ३७ टी. ५१५१ क्रमांकाच्या ट्रकने या दोघा दाम्पत्यास जोरदार धडक दिली. यामध्ये वैशाली सोमटकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीष सोमटकर गंभीर जखमी झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी वैशाली यांना मृत घोषीत केले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक पसार झाला. पातूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरAccidentअपघात