ट्रकने अँपेला उडविले; चालक जागीच ठार
By Admin | Updated: November 24, 2014 01:44 IST2014-11-24T01:44:42+5:302014-11-24T01:44:42+5:30
पारस फाट्यानजिक अपघात.

ट्रकने अँपेला उडविले; चालक जागीच ठार
बाळापूर (अकोला ): भरधाव ट्रक व अँपेची समोरासमोर धडक होऊन त्यात अँपेचालक जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर पारस फाट्यानजिक रविवारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, अकोल्याहून खामगावकडे जात असलेल्या एम. पी. 0९ एच.जी. ६५२७ क्रमांकाच्या ट्रकने बाळापूरहून अकोल्याकडे जात असलेल्या एम. एच. ३0 ए.बी. ३१६0 क्रमांकाच्या अँपेला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार हो ती की, यात अँपेचा चुराडा झाला व अँपेचालक शे.वजीर अ. रहेमान ऊर्फ सैलानी (३५ रा. आबादनगर, बाळापूर) हा जागीच ठार झाला. ही घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. बाळापूर पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचले.
महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांनी मृतकाच्या ना तेवाईकांची समजूत काढली. पोलिसांनी ट्रक चालक मुकेश तुळशीदास वास्केल (२५, रा. काटफोड, ता. फलेगाव, जि. देवास, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३0४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.