ट्रक दुकानात घुसला, कार उलटली!

By Admin | Updated: July 6, 2016 02:25 IST2016-07-06T02:25:12+5:302016-07-06T02:25:12+5:30

कौलखेड चौक आणि पोलीस मुख्यालय रोडवरील घटना.

The truck entered the shop, the car broke! | ट्रक दुकानात घुसला, कार उलटली!

ट्रक दुकानात घुसला, कार उलटली!

अकोला: बाश्रीटाकळी येथे जात असलेला एक ट्रक मंगळवारी पहाटे कौलखेड चौकासमोर असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात घुसला तर दुपारी भरधाव जात असलेली कार पोलीस मुख्यालय ते खदान पोलीस स्टेशनच्या मध्ये उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या दोन्ही अपघातात कुणालाही दुखापत झाली नसली तरी ट्रकचे व कारचे नुकसान झाले आहे.
खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोमवारी मध्यरात्री कौलखेड चौकात गस्तीवर असताना एक ट्रक बाश्रीटाकळीकडे जात होता. या ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचार्‍यांनी ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा केल्यानंतर ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण गेल्याने ट्रक कौलखेड चौकासमोर असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात घुसला.
फर्निचर दुकानात कुणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र ट्रकचे नुकसान झाले असून या प्रकरणी खदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर मंगळवारी दुपारी ४ वाजता खोलेश्‍वर परिसरातील रहिवासी बगरेट हे त्यांची एम एच ३0 एएफ ३७१३ क्रमांकाची कार घेऊन जात असताना त्यांच्या कारचा एक टायर अचानक फुटल्याने कार जेल चौक रोडवर उलटली. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे.

Web Title: The truck entered the shop, the car broke!