अपघातास कारणीभूत ट्रकचालकास अटक

By Admin | Updated: December 3, 2014 01:12 IST2014-12-03T01:12:04+5:302014-12-03T01:12:04+5:30

नवसाळ फाट्यावरील भीषण अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या चालक गजाआड.

The truck driver was arrested for the accident | अपघातास कारणीभूत ट्रकचालकास अटक

अपघातास कारणीभूत ट्रकचालकास अटक

मूर्तिजापूर (अकोला) : नवसाळ फाट्यावर १ डिसेंबरला पहाटे सात निष्पाप जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या चालकास अटक करण्यात आली. ट्रकने ओम्नी व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या अपघातप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रकचालकाला सोमवारी रात्रीच शोधून काढण्यात यश मिळविले.
अक्षयलाल राम आसरे (२७, रा. अंकलेश्‍वर, गुजरात) असे ट्रकचालकाचे नाव आहे. तो मूर्तिजापूरनजीक असलेल्या एका ढाब्यावर लपून बसला असल्याची टीप सोमवारी रात्री पोलिसांना मिळाली होती.
मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे यांनी मानाचे ठाणेदार सुनील हुड यांना ही माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार हुड यांनी हेडकॉन्स्टेबल नरेंद्र पद्मने , उमक, शे. इरफान यांच्यासमवेत संबंधित ढाब्यावर जाऊन ट्रकचालकास अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The truck driver was arrested for the accident