ट्रकची कारला धडक; एक गंभीर
By Admin | Updated: September 3, 2016 02:15 IST2016-09-03T02:15:35+5:302016-09-03T02:15:35+5:30
राष्ट्रीय महामार्गावर पोलीस स्टेशनसमोरच झाला अपघात.

ट्रकची कारला धडक; एक गंभीर
बोरगाव मंजू (जि. अकोला), दि. २: राष्ट्रीय महामार्गावर पोलीस स्टेशनसमोर भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.30 वाजता घडली. अकोल्याकडून मालवाहू ट्रक क्र. एमएच ३१ बी २८१ हा मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे जात होता. दरम्यान, बोरगाव मंजू येथील पोलीस स्टेशनसमोर ट्रकने समोरून येत असलेल्या कार क्र. एमएच 0१ पीए १४३४ ला धडक दिली. यामध्ये नितीन साबळे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भास्कर तवर आपल्या सहकार्यासह घटनास्थळावर दाखल झाले व जखमीस उपचारास हलविले.