ट्रकची भरधाव बुलेटला धडक
By Admin | Updated: April 18, 2017 20:27 IST2017-04-18T20:27:53+5:302017-04-18T20:27:53+5:30
अकोला - रेल्वे स्टेशन चौकाकडून टॉवरकडे येत असलेल्या एका ट्रकने समोर निघण्याच्या तयारीत असलेल्या बुलेटला जबर धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी अग्रसेन चौकात घडली.

ट्रकची भरधाव बुलेटला धडक
अग्रसेन चौकातील घटना, बुलेटचालक गंभीर जखमी
अकोला - रेल्वे स्टेशन चौकाकडून टॉवरकडे येत असलेल्या एका ट्रकने समोर निघण्याच्या तयारीत असलेल्या बुलेटला जबर धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी अग्रसेन चौकात घडली. या अपघातात बुलेटस्वार इसमाचा एक पाय निकामी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
अकोटमधील हनुमान नगर येथील रहिवासी गोपाल अरुण गोंडागरे हे एम एच ३० एजे ४०८० क्रमांकाच्या बुलेट या दुचाकीने अकोला शहरात येत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव असलेल्या एम एच ३० एएफ ००६७ क्रमांकाच्या ट्रकने अग्रसेन चौकामध्ये जबर धडक दिली. ट्रकच्या समोरील चाकात आल्याने गोपालच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, एक पाय निकामी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या अपघात प्रकरणातील ट्रक रामदास पेठ पोलिसांनी जप्त केला असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.