कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ७० गुरांचा ट्रक जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:13 IST2020-12-07T04:13:29+5:302020-12-07T04:13:29+5:30

शनिवारी रात्रीदरम्यान एका ट्रकमध्ये गुरे कोंबून नेण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी यू.पी. २१ सीएन. ३०४० क्रमांकाच्या ...

Truck of 70 cattle for slaughter seized | कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ७० गुरांचा ट्रक जप्त!

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ७० गुरांचा ट्रक जप्त!

शनिवारी रात्रीदरम्यान एका ट्रकमध्ये गुरे कोंबून नेण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी यू.पी. २१ सीएन. ३०४० क्रमांकाच्या ट्रकला पकडले. ट्रकची तपासणी केली असता, त्यात निर्दयीपणे ७० गुरे कोंबलेली आढळून आली. गुरे खामगावकडे नेण्यात येत हाेती. चालक ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला असता, उभ्या ट्रकमध्ये गुरांची धडपड सुरू असल्याची बाब आसपासच्या लोकांनी दिसली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, तायडे यांनी तत्काळ महामार्गावरील मेवाड ढाब्यावर छापा घातला. चालकाला ही बाब कळल्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. बाळापूर पोलिसांनी गुरे व ट्रक असा ३० ते ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Truck of 70 cattle for slaughter seized