शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग; ३१ जानेवारी ठरणार खगोलप्रेमींसाठी पर्वणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:16 AM

अकोला : खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे  आज बुधवारी, ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता.

ठळक मुद्दे१५२ वर्षांनी दिसणार दुर्मीळ नजराणा! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे  आज बुधवारी, ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता.ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. ‘सुपरमून’ हे नाव रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये दिले होते. अशा वेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३0 टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार, ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५९ हजार किलोमीटर अंतरावर येईल. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसेल.दुसरीकडे एका इंग्रजी महिन्यात ज्या वेळी दोन पौर्णिमा येतात, त्या वेळी दुसर्‍या पौर्णिमेच्या चंद्रास ह्यब्ल्यूमून  म्हणतात. जरी त्याला ‘ब्ल्यूमून’ म्हटले गेले असले, तरी त्या वेळी चंद्र काही ‘ब्ल्यू’ रंगाचा दिसत नाही. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ म्हटले आहे. याचप्रमाणे बुधवार, ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहणदेखील आहे. भारतातून ते खग्रास स्थितीत दिसेल.अशा प्रकारे बुधवार, ३१ जानेवारी रोजी ‘खग्रास चंद्रग्रहण’, ‘सुपरमून’ आणि ‘ब्ल्यूमून’ असा तिहेरी योग आला आहे. म्हणून खगोलप्रेमींच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे. छायाचित्रकारांनादेखील ही एक मौल्यवान संधी आहे.

गायगाव येथे चंद्रग्रहण अनुभवण्याची संधीग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी नागरिकांना गायगाव येथील निसर्ग अभ्यास केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी अत्याधुनिक साधनाद्वारे चंद्रग्रहण पाहता येईल. नागरिक, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा,  असे प्रभाकर दोड यांनी कळविले. 

यावेळी घेता येईल अनोखे दर्शन अकोल्यात हे चंद्रग्रहण सायंकाळी 5.15 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत दिसेल.

हे ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आहे. म्हणजे चंद्राला आधीच ग्रहण लागलेलं असेल.  १५२ वर्षांनंतर हा योग आला आहे. पृथ्वीजवळ आल्यावर चंद्राला सुपरमून म्हणतात. चंद्राचा १४ टक्के आर मोठा दिसतो आणि ३0 टक्के अधिक प्रकाशमान दिसतो. - प्रभाकर दोड, खगोलशास्त्र अभ्यासक.  

टॅग्स :Lunar Eclipse 2018चंद्रग्रहण 2018SupermoonसुपरमूनAkola cityअकोला शहर