आदिवासी भागात कापूस क्षेत्र वाढवणार!
By Admin | Updated: March 27, 2015 01:29 IST2015-03-27T01:29:20+5:302015-03-27T01:29:20+5:30
अतिदुर्गम भागातील शेतक-यांना प्रशिक्षण.

आदिवासी भागात कापूस क्षेत्र वाढवणार!
अकोला : कापूस विदर्भातील नगदी पीक असून, या पिकाचे क्षेत्र आदिवासी भागात वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागाने पुढाकार घेतला असून, अतिदुर्गम भागातील आदिवासी शेतकर्यांना अमेरिकन आणि देशी कापूूस वाणांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अखिल भारतीय समन्वयित कापूस विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी उपप्रकल्पामध्ये अकोला, अमरावती जिल्हय़ातील आदिवासी शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी ग्राम साद्राबादी येथील शेतकर्यांना अमेरिकन आणि देशी कापूस वाणांची माहिती पेरणी व उत्पादन या विषयावर माहिती देण्यात आली. याकरिता येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाला या गावचे सरपंच रामदास धांडे, जिल्हा परिषद शिक्षक गणेश चव्हाण, डॉ.पंदेकृविच्या कापूस संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ.टी.एच. राठोड, डॉ. वैभव उज्जैनकर, शंकरराव देवकर यांची उपस्थिती होती. डॉ. राठोड यांनी यावेळी कापूस लागवड तंत्र, खत व्यवस्थापन तसेच कापसावरील लाल्या या रोगाची महिती शेतकर्यांना दिली.