ट्रॅव्हल्समधून दीड लाखांचे कापड चोरी
By Admin | Updated: March 13, 2016 01:55 IST2016-03-13T01:55:08+5:302016-03-13T01:55:08+5:30
खासगी बसमधून अज्ञात चोरट्यांनी चोरले सुमारे दीड लाख रुपयांचे कापड.

ट्रॅव्हल्समधून दीड लाखांचे कापड चोरी
अकोला: सुरतवरून अमरावती येथे जात असलेल्या आकाश ट्रॅव्हल्सच्या बसमधून अज्ञात चोरट्यांनी सुरत ते अकोला या दरम्यान सुमारे दीड लाख रुपयांचे कापड चोरी गेल्याची घटना शनिवारी पहाटे उजेडात आली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
लक्कडगंज येथील राहिवासी मो. जुबेर यांच्या नावाने सुरतवरून अकोला येत असलेल्या आकाश ट्रॅव्हल्सच्या जीजे 0५ बीटी ७७११ क्रमांकाच्या बसमध्ये सुमारे दीड लाख रुपये किमतीचे चार डाग कापड अकोल्यात आणण्यासाठी शुक्रवारी रात्री टाकले होते. मात्र, सदरची बस अकोला येथे पोहोचल्यानंतर कापड मालकाने कापड बघितले असता त्यांच्या कापडाचे चारही डाक गायब होते. त्यामुळे त्यांनी आकाश ट्रॅव्हल्सच्या चालकाला विचारणा केली असता त्यांनीही या संदर्भात अनभिज्ञता दर्शविली. यावरून मो. जुबेर यांनी या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलिसात केली असून, पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे.