कत्तलीच्या गुरांची वाहतूक, आरोपीला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:50+5:302021-05-14T04:18:50+5:30

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गोर्धा ते दानापूर मार्गावर हिंगणी बु. गावाजवळ पोलिसांना एका वाहनामध्ये तीन बैल निर्दयतेने कोंबलेल्या व ...

Transportation of slaughtered cattle, accused denied bail | कत्तलीच्या गुरांची वाहतूक, आरोपीला जामीन नाकारला

कत्तलीच्या गुरांची वाहतूक, आरोपीला जामीन नाकारला

Next

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गोर्धा ते दानापूर मार्गावर हिंगणी बु. गावाजवळ पोलिसांना एका वाहनामध्ये तीन बैल निर्दयतेने कोंबलेल्या व जखमी अवस्थेत आढळून आले. कत्तल करण्याच्या उद्देशाने हे बैल वाहन चालक मकसूद खाँ याकूब खाँ रा. इंदिरा नगर हिवरखेड घेऊन जात होता. त्याने सदर बैल है सलिमोद्दीन ग्यासोद्दीन याचे असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी वाहनासह २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही बैलांना गोरक्षणमध्ये पाठविण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान एक बैल मरण पावला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या घटनेपासून आरोपी सलिमोद्दीन ग्यासोद्दीन फरार आहे. त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सरकारतर्फे अजित देशमुख यांनी बाजू मांडली.

Web Title: Transportation of slaughtered cattle, accused denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.