झाड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: March 18, 2017 15:28 IST2017-03-18T15:28:23+5:302017-03-18T15:28:23+5:30

मेडशी ते मालेगाव या मार्गावरील वाहतूक शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती.

Transport disrupts due to tree fall | झाड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

झाड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

वाशिम - रस्त्यालगतचे निंबाचे झाड पडल्यामुळे मेडशी ते मालेगाव या मार्गावरील वाहतूक शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती. उन्हाळ्याला सुरूवात झाली की आग लावून झाडांना जमिनदोस्त करण्याचे प्रकार सुरू होतात. असाच प्रकार शनिवारी मेडशी ते इरळा या दरम्यान दिसून आला. झाडाच्या बुंध्याला आग लागल्याने झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळेसाठी ठप्प होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Transport disrupts due to tree fall