नऊ नायब तहसीलदारांच्या बदल्या!

By Admin | Updated: June 7, 2017 01:15 IST2017-06-07T01:15:21+5:302017-06-07T01:15:21+5:30

अकोला: जिल्ह्यातील नऊ नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ५ जूनपर्यंत पाच नवे नायब तहसीलदार रुजू झाले.

Transitions of nine nah tehsildars! | नऊ नायब तहसीलदारांच्या बदल्या!

नऊ नायब तहसीलदारांच्या बदल्या!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील नऊ नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ५ जूनपर्यंत पाच नवे नायब तहसीलदार रुजू झाले.
तेल्हाऱ्याचे नायब तहसीलदार दिनेश यांची नागपूर विभागात, बाळापूरचे नायब तहसीलदार मदन जोगदंड यांची नागपूर विभागात, जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो शाखेचे नायब तहसीलदार आर.के. कुऱ्हाडे यांची यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे, बाळापूरचे नायब तहसीलदार बी.बी. बर्वे यांची वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे, अकोल्याचे निवासी नायब तहसीलदार यशवंत हातेकर यांची वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, तेल्हारा येथील नायब तहसीलदार डी.डी. ढबाले यांची यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, तेल्हाऱ्याचे नायब तहसीलदार बी.एस. किटे यांची बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, अकोट येथील नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम यांची औरंगाबाद विभागात बदली करण्यात आली. मूर्तिजापूर येथील परिविक्षाधीन नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांची मूर्तिजापूर येथेच नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. बदली करण्यात आलेल्या तहसीलदारांच्या रिक्त जागेवर पाच नवीन नायब तहसीलदार तहसीलदार रुजू झाले. त्यामध्ये नायब तहसीलदार विजय सुराडकर -तेल्हारा, श्रीकांत मिसाळ -मूर्तिजापूर, प्रजा टाकळे-बाळापूर, अतुल सोनवणे-बाळापूर, स्नेहा गिरी गोसावी- जिल्हाधिकारी कार्यालय रोहयो शाखेत रुजू झाल्या.

Web Title: Transitions of nine nah tehsildars!