एपीआय, पीएसआयच्या बदल्या; चार नवे एपीआय, पीएसआय येणार
By नितिन गव्हाळे | Updated: July 6, 2023 17:33 IST2023-07-06T17:33:28+5:302023-07-06T17:33:40+5:30
अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी ४ जुलै रोजी पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची ...

एपीआय, पीएसआयच्या बदल्या; चार नवे एपीआय, पीएसआय येणार
अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी ४ जुलै रोजी पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर केली असून, अकोल्यातील पीएसआय, एपीआयच्या इतर जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. चार पीएसआय व चार एपीआयच्या अकोल्यात बदल्या झाल्या आहेत.
पोलिस उपनिरीक्षकांमधून अनिता इंगळे यांची वाशिम, चंद्रकांत ठोंबरे यांना मुदतवाढ, सविता कुवारे यांची बुलढाणा, संजय सिरसाठ यांना मुदतवाढ, सागर हटवार यांची अमरावती ग्रामीण, नितीन सुशीर, रितेश दीक्षित, वर्षा राठोड यांची यवतमाळ येथे बदली झाली. पीएसआय विलास बोपटे अमरावती, प्रवीण सोनवणे बुलढाणा, शरद तायडे अमरावती, राजेश हेडाऊ अमरावती यांची अकोल्यात बदली झाली आहे.
यासोबतच एपीआय वीणा भगत यांची वाशिम, ज्ञानोबा फड-अमरावती, विशाल नांदे- यवतमाळ, अजयकुमार वाढवे- बुलढाणा येथे बदली झाली असून, त्यांच्या जागेवर गोरख चौधरी यवतमाळ, नीलेश करंदीकर अमरावती, रवींद्र लांडे बुलढाणा, गजानन तडसे वाशिम, राजेश गाठे वाशिम, गंगाधर दराडे अमरावती यांची अकोल्यात बदली झाली आहे.