महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या
By Admin | Updated: June 6, 2016 02:42 IST2016-06-06T02:42:38+5:302016-06-06T02:42:38+5:30
अकोल्याचे डामसे पुण्याला; वाशिमचे धडके नांदेडला.

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या
अकोला: महावितरणच्या राज्यभरातील उच्चपदस्थ अधिकार्यांच्या शनिवारी बदल्या करण्यात आल्या. याचाच एक भाग म्हणून अकोला परिमंडळांतर्गत येणार्या अकोला शहर विभाग व वाशिम येथील कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगडमधून निर्गमित करण्यात आले. अकोला परिमंडळात येत असलेल्या अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत डामसे यांची बदली पुणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परभणी येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले डी. एम. मानकर अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. डी. एम. मानकर यांनी यापूर्वीही अकोला येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले आहे. वाशिमचे कार्यकारी अभियंता एस. के. धडके यांची बदली नांदेड येथे झाली आहे. त्यांच्या जागी चंद्रपूर येथून विजय मेश्राम येणार आहेत. दरम्यान, झोनमधील कार्यकारी अभियंता देशमुख सेवानवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर चंद्रपूर येथील काकाजी रामटेके यांची बदली करण्यात आली आहे.