Tragic end to a young woman who got married after four days in an accident! | चार दिवसांनी लग्न असलेल्या युवतीचा अपघातात करुण अंत!

चार दिवसांनी लग्न असलेल्या युवतीचा अपघातात करुण अंत!

मुलगी ठार, वडील जखमी

वाडेगाव : पातूर-बाळापूर रस्त्यावर ट्रॅक्टर वाडेगावकडे जात असताना, भरधाव ट्रॅक्टरने देऊळगाव बसस्थानकजवळ दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. अपघातात चार दिवसांवर लग्न असलेल्या युवतीचा करुण अंत झाला. यात वडीलही गंभीर जखमी झाले.

दुचाकीने वडील व मुलगी पातूर येथून देवीचे दर्शन घेऊन विवरा येथे घरी जात असताना गिट्टीने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने मागच्या बाजूने दुचाकीला धडक दिली. यामध्ये वडील खाली कोसळले, तर मुलीच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने, ती गंभीर जखमी झाली. स्थानिक देऊळगाव येथील नातेवाइकांनी दोघांना उचलून उपचारासाठी दवाखान्यात नेले असता, पल्लवी अनिल धोत्रे हिचा मृत्यू झाला. पल्लवीचे २६ एप्रिल रोजी लग्न होणार होते. परंतु, लग्नापूर्वीच नियतीने डाव साधला.

तिला जास्त मार लागल्याने गंभीर जखमी असल्याने त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. या मुलीचे चार दिवसांवर लग्न असल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले आहे. ट्रॅक्टरचालकाला अटक करण्यात आली असून याबाबत पातूर पोलीस तपास करीत आहेत. वर मुलाला मुलीने आजपर्यंत व्हिडीओ कॉल केला नाही. परंतु, गुरुवारी तिने व्हिडीओ कॉल करून संवाद साधला. दोघे एकमेकांशी बोलले. परंतु, त्यांचे हे बोलणे अखेरचे ठरले. मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Tragic end to a young woman who got married after four days in an accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.