पोलिसांचे शेगावात पथसंचलन

By Admin | Updated: September 3, 2014 22:29 IST2014-09-03T22:28:46+5:302014-09-03T22:29:46+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शेगाव शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन.

Traffic of the police's shaft | पोलिसांचे शेगावात पथसंचलन

पोलिसांचे शेगावात पथसंचलन

शेगाव : शेगाव शहरात मागील दोन वर्षापासून घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या शहराच्या यादीत शहराचे नाव सामिल झालेले असल्याने सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने आज स्वत: जिल्हा पोलिस अधिक्षक श्यामराव दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली ६00 पोलिसांच्या ताफ्याने शेगाव शहरात पथसंचलन केले.
गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव आणि शिवजयंती मिरवणुकीत घडलेल्या घटनांमुळे शांत शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या संतनगरी शेगावचे नाव अ ितसंवेदनशील शहराच्या यादीत आले आहे. यामुळे पोलिस प्रशासन या शहराकडे विशेष लक्ष देत आहे. येणार्‍या उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या असून यामध्ये विनापरवाना मंडळांवर कारवाई करणे, धार्मिकस्थळ कापडाने झाकून घेणे, शहरात अतिरीक्त कुमक व दंगाकाबू पथकासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या या शहरासाठी करणे, मंडळाचे कार्यकर्ते व शांतता समि तीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका आयोजीत करणे आदींचा उपायोजनांमध्ये सहभाग आहे. आज बुधवारी शेगाव जिल्हाभरातील पोलिसांसह राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल, दंगाकाबू पथक, जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व शेगाव शहर व ग्रामीण पोस्टेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. या पथसंचलनात जिपोअ दिघावकर, अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर, ग्रा.पो.स्टे.चे ठाणेदार विजयकुमार अकोत, शहराचे ठाणेदार शर्मा, जिविशाचे खुटाफळे आदींचा समावेश होता.

Web Title: Traffic of the police's shaft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.