शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

अकोला वाहतूक पोलिसांची १00 ऑटोचालकांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:01 PM

खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा शहरात अवैधरीत्या  प्रवासी वाहतूक करतात. या ऑटोरिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण  शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई सुरू केली.  पोलिसांनी सायंकाळपर्यंत १00  ऑटोरिक्षा जप्त करून, चालकांकडून ६0 हजारांवर दंड वसूल केला. 

ठळक मुद्देअवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध मोहीम६0 हजार रुपये दंड वसूल!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा शहरात अवैधरीत्या  प्रवासी वाहतूक करतात. या ऑटोरिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण  शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई सुरू केली.  पोलिसांनी सायंकाळपर्यंत १00  ऑटोरिक्षा जप्त करून, चालकांकडून ६0 हजारांवर दंड वसूल केला. शहरात मोठय़ा संख्येने खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा अवैधरी त्या प्रवासी वाहतूक करतात. एवढेच नाही, तर शहरातील प्रत्येक रस्त्यावर  ऑटोरिक्षाचालक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने  ऑटोरिक्षा उभ्या करतात. त्याचा वाहनचालक व नागरिकांना त्रास होतो. प्रसंगी  अपघाताच्या घटनासुद्धा घडतात. शहरात परमिट असलेल्या ऑटोरिक्षांसोबतच  जिल्हय़ातील ग्रामीण भाग आणि परजिल्हय़ातील ऑटोरिक्षांची भर पडली  आहे. अनेक ऑटोरिक्षाचालकांकडे शहर परमिट नाहीत. अशाही परिस्थितीत  हे ऑटोरिक्षा शहरात धावतात. ग्रामीण परमिट असलेल्या ऑटोरिक्षांनीही  शहरात अतिक्रमण केले आहे. याविषयी अनेक ऑटोरिक्षाचालक संघटनांनी  वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्याची दखल घेण्यात येत  नव्हती. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची  जबाबदारी स्वीकारल्यावर कारवाईस सुरुवात केली. गुरुवारी पोलीस निरीक्षक  विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी  चौकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या, विनापरमिट वाहतूक करणार्‍या  ऑटोरिक्षाचालकांवर मोटरवाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांचे  ऑटोरिक्षा जप्त करून, शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात आणले.  याठिकाणी वाहतूक पोलिसांनी ऑटोरिक्षाचालकांकडून ६0 हजारावर दंड  वसूल केला.  पोलिसांनी आणखी काही दिवस ही मोहीम राबवावी, अशी  मागणी नागरिकांकडून होत आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRto officeआरटीओ ऑफीस