वाहतूक निरीक्षकाची अधीक्षकास मारहाण
By Admin | Updated: April 3, 2017 02:50 IST2017-04-03T02:50:52+5:302017-04-03T02:50:52+5:30
मध्यवर्ती बसस्थानकामधील प्रकार, वाहतूक निरीक्षकाविरु द्ध गुन्हा दाखल.

वाहतूक निरीक्षकाची अधीक्षकास मारहाण
अकोला, दि. २- मध्यवर्ती बसस्थानकावरील वाहतूक निरीक्षकाने सहायक कार्यशाळा अधीक्षकास मनपा निवडणुकीतील एका विजयी उमेदवाराच्या हजेरीवरून बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानक येथे कार्यरत असलेले वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे यांनी सहायक कार्यशाळा अधीक्षक नीलेश बोदडे यांना मनपामध्ये विजयी झालेल्या एका उमेदवाराची हजेरी लावण्याचे सांगितले, मात्र जो व्यक्ती कार्यालयात हजर नाही, त्याची हजेरी लावण्यास नीलेश बोदडे यांनी नकार दिल्याने, वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे यांनी बोदडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या नीलेश बोदडे यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत इंगळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३, २९४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी मात्र अद्यापही प्रशांत इंगळे याच्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत असून, कर्मचार्यांना मारहाण करणार्या वाहतूक निरीक्षकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
१५0 चालक-वाहकांची तक्रार
वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे हे चालक-वाहकांशी असभ्य भाषेत बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे १५0 चालक-वाहकांनी प्रशांत इंगळे यांची तक्रार राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इंगळे यांनी नीलेश पिंजरकर नामक कर्मचार्यालाही मारहाण केल्याची माहिती आहे.