तीनशे वर्षांपासून गणेश पूजनाची परंपरा

By Admin | Updated: September 2, 2014 01:04 IST2014-09-01T21:38:14+5:302014-09-02T01:04:24+5:30

माती व गवताचा पुरातन गणपती

Tradition of Ganesh Pujani for three hundred years | तीनशे वर्षांपासून गणेश पूजनाची परंपरा

तीनशे वर्षांपासून गणेश पूजनाची परंपरा

अकोला : जुन्या शहरातील पुरी यांच्या घरात असलेली गणेश मूर्ती तीनशे वर्षांपूर्वीची आहे. तेव्हापासून त्यांच्या घरी गणेश पूजनाची परंपरा सुरू आहे.
जुन्या शहरातील शिवाजीनगरात गोसावी यांचा वाडा आहे. हा वाडा पूर्वी संन्यासी असलेल्या गोसावी यांना राहण्यासाठी बांधण्यात आला होता. या ठिकाणी संन्यासी गणेश पुरी यांचे वास्तव्य होते. त्यानंतर उदय पुरी व राघव पुरी यांनी वास्तव्य केले. हे सन्यासी होते. राघव पुरी यांनी नारायण पुरी यांना दत्तक घेतले व तेव्हापासून पुरी परिवार या घरात वास्तव्यास आहे. घराच्या सुरुवातीलाच डाव्या बाजूने श्री गणेशाची चार फुटाची मूर्ती आहे. मूर्ती माती व गवताने बनविण्यात आलेली आहे. नागाच्या वेटाळावर गणेश विराजमान असून, गणेशाच्या डोक्यावर पाच मुखधारी नाग फणा काढून आहे. मूर्तीच्या डोक्यावर मोत्यासारख्या खड्यांचा मुकूट आहे. तसेच गणेशाच्या मूर्तीवर भैरवाची मूर्ती आहे. ही मूर्ती शेकडो वर्षांपासून असल्याचे विक्रम पुरी यांनी सांगितले. मातीची असल्यामुळे या मूर्तीची काही प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे पुरी यांनी मूर्तीच्या मागच्या बाजूला संगमरवर लावले आहे.

Web Title: Tradition of Ganesh Pujani for three hundred years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.